इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा श्रीगुरुचरित्र ग्रंथ श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. आजही कित्येक घरोघरी याचे नित्य पारायण चालू आहे. श्रीगुरुचरित्राला पाचवा वेद असे म्हणतात. श्रीदत्तात्रेयांचे अनेक अवतार झाले त्यात श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीगुरू नृसिंह सरस्वती या दोन थोर अवतारी पुरुषांच्या कार्यामुळे दत्तोपासना सर्वत्र पोहोचली. त्यातील श्रीनृसिंह सरस्वतींचे कार्य फारच मोठे आहे. त्यांच्या वास्तव्यामुळे औदुंबर, गाणगापुर, नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी) यांना तीर्ह्क्षेत्र माहात्म्य प्राप्त झाले आहे. श्रीगुरुचारीत्रात या दोन अवतारी पुरुषांचे जीवनकार्य, त्यांनी केलेले चमत्कार, त्यांनी केलेला अनेकांचा उद्धार, त्यांनी केलेला उपदेश इत्यादी अनेक कथामाध्यमातून आलेले आहेत. आजही अनेक दत्तोपासक या ग्रंथाचे नित्य पठण -श्रवण करतात. या ग्रंथाचे साप्ताह पारायण होत असले तरी अनेक वाचकांना ग्रंथाचे पूर्ण आकलन होत नाही. याचे पूर्णपणे आकलन होण्यासाठी आम्ही याचे हि अॅप्लिकेशन आणत आहोत. याचे वाचन केले असता मूळ ग्रंथ समजून घेणे सोपे जाईल.